इस्लामी आक्रमण आणि हिंदूंची मंदिरे

 मुघलांनी हिंदूंची किती देवळे पाडली आणि महाराजांनी ही त्याच जिद्दीने मशिदी पाडून मंदिरे बांधली हे बघू या समकालीन पुराव्या सहित _


लेख:  मनोज शिवाजी सोनवणे.✍️

१. "हिंदूंच्या पाठशाळा आणि देवळे पाडून टाका. हिंदू धर्म सार्वजनिक रित्या पाळण्यावर ताबडतोब बंदी आणा     
            _औरंगजेबाची राजाज्ञा

औरंगजेबाने दिलेली ही राजाज्ञा ९ एप्रिल १६६९ ची असून, ती औरंगजेबाचे अधिकृत दरबारी चरित्र असलेल्या मआसिर ए आलमगिरी मध्ये दिली आहे.

या आज्ञेचा मूळ फार्सी पाठ पुढील प्रमाणे :

फार्सी पाठ (Persian Text)

ब- अर्ज ए ख़ुदावंद ए दीन परवर रसीद कि दर सूबा ए थत्ता व मुल्तान खुसूस बनारस ब्राहमनान ए बतालत निशान दर मदारिस ए मुक़र्रर ब-तदरीस ए किताब ए बताला इष्तिघाल दारंद व रघिबान व तालिबान अज़ हुनुद व जिहत ए तहसील ए उलुम ए शूम नज्द ए आन जमआते गुमराह मी आयंद. अहकामे इस्लाम निज़ाम ब-नाज़िमाने कुल सुबाजात सादर शुद कि मदारिस व मुआबिद ए बैदीनान दस्तख्वाश ए इन्हिदाम साज़न्द व ब- ताकीद ए अकयाद तौर ए दर्स व तदरीस व रस्म ए शुयु ए मज़हब ए कुफ़रआययनान बरअन्दाज़न्द.

"मराठी अर्थ :

इस्लाम धर्माचा प्रसार करण्यास उत्सुक असलेल्या बादशहांना (औरंगजेब) विदित झाले की तट्टा आणि मुलतान या प्रदेशात आणि विशेष करून बनारस मधले ब्राह्मण लोक तेथे स्थापित असलेल्या त्यांच्या पाठशाळांमधून जिज्ञासूंना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या खोट्या ज्ञानाच्या पुस्तकांमधून शिकवत आहेत. त्यांचे हे ओंगळ आणि घाणेरडे ज्ञान घेण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशातून हिंदू आणि मुसलमान तेथे येतात. इस्लाम धर्माची दृढ स्थापना करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या बादशहांनी ( औरंगजेब) सर्व सुभ्यांच्या सुभेदारांना आज्ञा केली की सर्व प्रांतांमधील हिंदूंची प्रार्थनास्थळे आण पाठशाळा जमीनदोस्त कराव्यात आणि अत्यंत त्वरेने हिंदूंना सार्वजनिक रित्या त्यांचा धर्म पाळण्यास मनाई करावी.

२. इस्लामी_आक्रमण_आणि_हिंदूंची_मंदिरे:_

'गझनीच्या महमूदाने १०२५ मध्ये सोमनाथाची मूर्ती फोडून तिचे तुकडे गझनीला नेले

*मूळ फारसी पाठ:-*

"व लश्कर ब- जानिब नहरवालाह व गुजरात बूद व मनात रा अज़ सोमनात बियावार्द व चहार किस्मत कर्द : यक किस्म बर दर मस्जिद ए जामी गज़नीन नहद.व दीगर किस्म बर दर कुश्क सुलतान, व एक किस्म ब मक्का फिरिस्ताद, व यक किस्म ब मदीना"

संदर्भ- तबकात ए नासिरी, मिनहाजुद्दीन, खंड १, पृ. २२९

मराठीत अर्थ खालील प्रमाणे:

सुलतानाने गुजरात येथील नहरवाला येथे सैन्य नेऊन, सोमनाथ येथून मनात ची मूर्ती आणली आणि तिचे चार तुकडे केले. एक तुकडा गझनीच्या मशिदीपुढे टाकणात आला, दुसरा तुकडा सुलतानाच्या राजवाड्या समोर टाकण्यात आला, आणखी एक तुकडा मक्केला पाठवण्यात आला व चौथा तुकडा मदिनेला पाठवण्यात आला.

३.बिंदू_माधव_मंदिर_आणि_धर्मांध_औरंगजेब

"ब मुजीब निविश्ता रफीउल अमीन दिवान बनारस ब-अर्ज रसीद के बुतखाना बिंदमहादव मिस्मार नमूदा दर बाब अहदाश नमूदन, मस्जिद हर चे अम्र शवद, हुक्म शूद के तय्यार नूमायद.

मराठीत अर्थ:

बनारस येथील दिवाण रफीउल अमीन याच्या लिहिल्यावरुन समजले की, बिंदु माधवाचे देऊळ पाडून टाकले. मशिदीच्या उभारण्याबाबत हुकूम व्हावा. हुकूम झाला की उभारावी.

औरंगजेबाच्या दरबारचा अखबार, १३ सप्टेंबर १६८२

४. फार्सी पत्र :

मअरूज़-इ बिसात बोसान-इ किब्ला- इ दीन-यावरान इस्वत-इ अहद-परस्तान गर्दीद कि, ब-मूजिब-इ हुक्म-इ-कझा अल-मझा, कार पर्दाजान बुतखाना-इ काशी बिशनाथ मुनहदिम गर्दानीदंद.

मराठीत अर्थ :

बादशाहाच्या सिंहासनासमोरील गालीचाचे चुंबन घेणाऱ्यांनी (बादशाहाच्या अधिकाऱ्यांनी विदीत केले की (बादशाही) अधिकाऱ्यांनी बादशाहाच्या हुकुमानुसार काशी विश्वनाथाचे देऊळ उद्ध्वस्त करविले (किंवा केले).

~मआसिर ए आलमगिरी, फार्सी पाठ, पृ.८८

सुलतान इल्तुतमिश कडून उज्जैनच्या महाकालेश्वराच्या देवळाचा विध्वंस, महाकालेश्वराची पिंड दिल्ली येथे नेऊन जामी मशिदीच्या समोर मुसलमानांनी तुडवावी म्हणून टाकली.

फारसी पाठ:

अज़ औंजा ब तरफ उज्जैन नगरी रफ़्त व बुतखाना ए महाकाल दीव ( देव ) रा खराब कर्द व तमसाल बिक्रमाजीत के बादशाह उज्जैन नगरी बूद अस्त व अज़ अहद ऊ ता बदीन वक़्त यक हजार व सी सद व शांझदह साल अस्त व् तवारीख ए हिन्दुआने अज़ अहद वी मी निविसंद व चंद तमसाल दीगर अज़ बर जंग रेख्ता बूदंद बा संग ए महाकाल ब-हजरत देहली आवरदा

तबकात ए नासिरी . मिनहाजुद्दीन फारसी पान न. १७६

*ही झाली मुघलांची विकृती त्यावर हिंदूंनी कसे हट्टाने किंवा प्रतिक्रिया दिली असे समजा ते पुढील प्रमाणे :

 १. संभाजी महाराजांनी मद्रसे आणि मशीद उद्ध्वस्त केल्यात हे सय्यद कुतुब्बुदिन सज्जादशिन म्हणतोय पत्रात:

मूळ पत्राचा मराठीत अनुवाद:
सय्यद कुतबुद्दीन सज्जादशीन यांनी पुढीलप्रमाणे अर्ज केला आहे. नरकवासी संभाजी याने धर्मद्वेषामुळे तळकोकणचे मद्रसे आणि मशिदी उद्ध्वस्त केल्या. मी (कुतूबुद्दीन) दोन जुम्मा मशिदी आणि एक मद्रासा ही दुरुस्ती केली आहे . पण इतर मद्रसे आणि जुम्मा मशिदी अद्याप नामशेष आहेत...

संदर्भ: कारनामा मातबरखानाची पत्रे

२. नाशिक येथील श्री सुदंर नारायण मंदिर पाडून मशीद आणि कबरी बांधल्या होत्या त्या पाडून तेथे परत श्री सुंदर नारायण मंदिर गंगाधर यशवंत यांनी बांधीले असा स्फष्ट उल्लेख शिवचरित्र साहित्य खंड २ ले ३१४ मध्ये मिळतो.
आजही ते मंदिर नाशिक ला आहे.

शोणाचलपती येथे मशीद पाडून देऊळ बांधन्यात आले.

संदर्भ: राज्यव्यवहार कोश प्रस्तावना, शिवचरित्र प्रदीप, पान नं. १४३

३.*मशीद पाडून देऊळ बांधले.

Après avoir restauré la forteresse de Gingy et nommé Ram Raja, roi de cette place, le Roi Sivaji se rendit à Tirouvannamalé. C'était un dévot de Siva. On se rappelle que les Musulmans avaient laissé tomber en ruines puis converti en mosquées, la pagode de Sivan à Tirouvannamalé et celle dédiée à Samoattira Peroumal. Sivaji detruisit ces deux mosquées, restaura la pagode de Sivan et avec les briques provenant de la démolition de la pagode dédiée à Samouttira Peroumal, il fit construire un escalier autour da mandabom aux mille piliers bâti par les Naikers, fit rassembler cent mille vaches dans ce mandabom pour installer le Sivalin gam et fit faire la cérémonie de la dédicace. C'est lui qui institua aussi la fête dite Kartigué tipam sur la colline.

मराठीत शिवचरित्र साहित्य खंड ८:

शिवाचे व समोत्तिरपेरुमल याचें देवालय पाडून मुसलमानांनी मशीदी बनविल्या होत्या. शिवाजीने त्या दोन्ही मशिदी नष्ट केल्या आणि तेथे शिवाच्या देवालयांची पुनः प्रतिष्ठापना केली आणि "समोत्तिरपेरूमल' याच्या देवालयांतील विटांचा उपयोग करून नायकराजांनी बांधलेला एक हजार खांबांचा जो मंडप आहे त्यापुर्डे गोपुर बांधलें. शिवलिंगाची प्रतिष्ठापना करतांना त्या सभामंडपांत एक लाख गाई आणल्या होत्या. तेथील टेकडविर कार्तिक महिन्यांत दीपोत्सव शिवाजीनेंच सुरु केला " ( p. 71 ).

संदर्भ: 

Histoire Detaillee Des Rois Du Carnatic by Narayanampoulle: Imprimerie Moderen. Pondichery, page 71


४. मशिदींचे रुपांतर धान्य कोठारामध्ये केले होते असे जॉन फ्रायर, समकालीन इंग्रज प्रवासी लिहितो त्याच्या पुस्तकात..

संदर्भ: 
New account of East India and Persia vol. 1. pg. 309 John Fryer


५.मशिदी भ्रष्ट केल्या . समकालीन इटालियन प्रवासी म्हणतोय.त्याच्या पुस्तकातील लेख खालीलप्रमाणे..

To make a mock of Shivä Ji, the Mahomedans had killed cows in temples; in retaliation he, too, ordered the throats of pigs to cut in the mosques of the Mahomedans. This was to demonstrate his valour and power of defying the Mogul armies.

संदर्भ:
Storia do mogor, vol 2, pg 119,

यातून हे समजते की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे सेक्युलर नव्हते.त्या मुळे जश्यास तसे उत्तर देवून त्यांनी मशिदी पाडल्यात.



संदर्भ: १.मआसिर ए आलमगिरी 
         २.तबकात ए नासिरी, मिनहाजुद्दीन,खंड १, पृ. २२९
          ३.औरंगजेबाच्या दरबारचा अखबार १३ सप्टेंबर १६८२
          ४.कारनामा मातबरखानाची पत्रे
          ५.शिवचरित्र साहित्य खंड ८
          ६.इतिहास अभ्यासक मंडळ

धन्यवाद🙏
जय शिवराय 🙏🚩

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा