सनातन धर्म: गुरु, आचार्य, पुरोहित, पंडित, पुजारी आणि ब्राम्हण यांच्यातील फरक जाणून घ्या🙏

 सनातन धर्म: गुरु, आचार्य, पुरोहित, पंडित, पुजारी आणि ब्राम्हण यांच्यातील फरक जाणून घ्या🙏


ब्रह्म तेजो बलं बलं


आपल्याकडे पुजारी ला पंडित जी आणि पुरोहित ला आचार्य असे संबोधले जाते आणि ते मान्य ही केले जाते माहिती नसल्यामुळे असो आपण जाणून घेऊ या पुढील प्रमाणे योग्य ते:

गुरु _

गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणजेच, जो व्यक्ती तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु आहे. गुरू म्हणजे अंधाराचा नाश करणारा. अध्यात्मिक विज्ञान किंवा धार्मिक विषयांवर प्रवचन देणारे आणि गुरू यांच्यात विविध फरक आहेत. गुरु आत्म् विकास आणि परमात्मा यावर बोलतो. प्रत्येक गुरू एक संत असतो, परंतु प्रत्येक संत गुरु असणे आवश्यक नाही. केवळ काही संतच गुरु होण्यासाठी पात्र असतात. गुरु म्हणजे ब्रह्म ज्ञानाचा मार्गदर्शक.

आचार्य:

ज्याला वेद व शास्त्रांचे ज्ञान आहे आणि जे गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करतात त्यांना आचार्य म्हणतात. आचार्यांचा अर्थ असा आहे की जो नीतिशास्त्र, नियम आणि तत्त्वे इत्यादींचा चांगला जाणकार आहे आणि इतरांना त्याची शिकवण शिकवितो. ज्याला धार्मिक विधी आणि यज्ञ इत्यादींमध्ये मुख्य म्हणून काम करणारे चांगले ज्ञान होते त्यांना आचार्य देखील म्हटले जाते. आजकाल आचार्य यांना महाविद्यालयाचे मुख्य अधिकारी आणि शिक्षक म्हणतात.

पुरोहित:

मानव आणि अतिमानवी शक्ती यांच्यामध्ये धर्माच्या आधारे मध्यस्थी करणारी अधिकृत व्यक्ती म्हणजे पुरोहित होय. पुरोहित दोन शब्दांनी बनलेला आहे. पर + हित म्हणजे असा व्यक्ती जो दुसऱ्यांच्या कल्याण ची चिंता करतो. हिंदू धर्मात पुरोहित हा कर्मकांड यथासांग जाणणारा म्हणून कर्मकांडाच्या नेतृत्वास आवश्यक असलेले पुण्य अंगी असणारी व्यक्ती होय. पुरोहिताच्या कार्याला ‘पौरोहित्य’ वा ‘पुरोहिती’ असे म्हणतात. 

जगातील बहुतेक सर्व समाजांतून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुरोहितांचे अस्तित्व आढळते. 

पुजारी: 


मंदिरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करणारे पुजारी. कुठल्याही मंदिरात नियमित पने पुजा करणारे .


पंडित:


पंड चा अर्थ होतो विद्वता . एखाद्या विशिष्ट ज्ञानामध्ये पारंगत असणे म्हणजे पांडित्य असे म्हणतात. पंडित म्हणजे एखाद्या विशिष्ट ज्ञानामध्ये कुशल असणे.पंडित ही अशी एक व्यक्ती जी विशिष्ट विद्या चे ज्ञान असणारे.

प्राचीन भारतात, वेद, शास्त्र इत्यादि विषयाचे मोठे ज्ञाते असलेले. त्या पंडितांना पाण्डे, पाण्डेय, पण्ड्या म्हणत असे. आजकाल हे नाव ब्राम्हणांचे उपनाव किंवा आडनाव आहेत. काश्मीरचे ब्राह्मण काश्मिरी पंडित म्हणून ओळखले जातात पंडीतच्या पत्नीला मूळ भाषेत पंडिताईन म्हंटले जाते.


ब्राम्हण: 

ब्राम्हण शब्द ब्रम्ह पासून निर्माण झाला आहे. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तो ब्राह्मण किंवा ब्रह्मज्ञान मिळवू लागला तोही ब्राह्मण.

स्मृती पुराणात ब्राम्हणाच्या ८ भेदांचे वर्णन मिळते~ मात्र, ब्राह्मण, श्रोत्रिय, अनुचान, भ्रूण, ऋषिकल्प, ऋषि आणि मुनि. श्रुतीत ८ प्रकारचे ब्राह्मण उल्लेख आहेत. याशिवाय वंशज, ज्ञान आणि पुण्य यांनी उन्नत झालेल्या ब्राह्मणांना 'त्रिशुक्ल' म्हणतात. 

ब्राह्मणाला धर्मिष्ठ विप्र आणि द्विज असेही म्हणतात, ज्यांचा कोणत्याही जातीशी किंवा समाजाशी संबंध नाही.


धन्यवाद🙏











टिप्पण्या

  1. सुंदर लेख आहे मनोज व सर्व प्रकार व्यवस्थित मांडले आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा